गोव्यात आढळले कोरोनाचे 280 रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात आज कोरोनाचे 280 रुग्ण सापडले आहेत. तर 227 जण बरे झाले आहेत. राज्यात आज देखील 1 हजार 707 कोविड रुग्ण उपचार घेत असून आज तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 48 वर पोचला आहे. गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा आकडा वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात आतापर्यंत 6 हजार 193 कोविड रुग्ण सापडले असून त्यातील 4 हजार 438 रुग्ण बरे झाले आहेत. 1 हजार 707 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असून मृतांचा आकडा अर्ध शतकाजवळ पोचला आहे. आता पर्यंत 48 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील मूरगाव तालुक्यामधील बरेच रुग्ण आहेत.

आज दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात बेती येथील 77 वर्षीय इसमाचा समावेश आहे. त्याचा कोविड हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. त्याशिवाय आके येथील 64 वर्षीय इसमाचे कोविड हॉस्पिटल मध्ये तर वेळसाव येथील 71 वर्षीय महिलेचे गोमेकॉत निधन झाल्याने मृतांचा आकडा 48 वर गेला आहे.