
होटगी रोडवरील क्लब 9 येथे जुगारअड्डा चालविणाऱ्या माजी आमदारासह 29 जणांना पोलिसांनी अटक केली असून, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांचा हा जुगारअड्डा आहे.
होटगी रोडवरील क्लब 9 येथे माजी आमदार रविकांत पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील कॅसिनोच्या धर्तीवर जुगारअड्डा सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस पाळत ठेवून होते. शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेने या क्लबवर छापा घातला असता माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह 29 जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांची रोकड, सव्वाचार लाख रुपयांचे मोबाईल व अन्य साहित्य असे साडेसहा लाख रुपयांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. माजी आमदार पाटील यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. विजापूरनाका पोलीस ठाण्यात पाटीलसह 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































