कश्मीर खोर्‍यात पुन्हा 2जी इंटरनेट सेवा बंद, सायंकाळी सहा वाजता सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा होत आहे. सगळीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्त चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. कश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव 2जी इंटरनेट सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. ही सेवा सायंकाळी 6 वाजता पुन्हा सुरू होईल

कश्मीर खोर्‍यात 25 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान सायंकाळी 6 ते 6 पर्यंत इंटरनेटची 2जी सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच व्हॉईस कॉलिंग, मेसेजिंग सेवाही आज सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

प्रजासत्ताकच्या पूर्वसंध्येला राज्यातील 20 जिल्ह्यातील 2जी इंटरनेट सेवा सुरू केली होती. त्यात पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांनाही इंटरनेट सुविधा मिळत होती. इंटरनेटवरील बंदी हटवल्यानंतर कश्मीरी लोक आता फक्त 301 साईट्स उघडून शकतात. परंतु आजही सोशल मीडियाच्या ऍप्सवर बंदी आहेत.