दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन 27 जानेवारीपासून

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलन 27 ते 29 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांसह जगभरातील विविध देशांमधील मराठी भाषिक मान्यवर, साहित्यिक यांना या संमेलनात निमंत्रित करण्यात येते. मागील वर्षी हे साहित्य संमेलन मुंबईत घेण्यात आले होते. या वर्षीचे संमेलनही मुंबईमध्येच होण्याची शक्यता आहे. या संमेलनासाठी 10 कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.