
सामना ऑनलाईन, मुंबई
गेल्या आठवडय़ात वांद्रे पश्चिम येथील एका पबबाहेर मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणप्रकरणी आणखी तीन जणांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. यापूर्वी तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. गुरुनिल सिंग हा शिक्षणाकरिता पंजाबहून मुंबईत आला होता. गेल्या आठवडय़ात तो मित्रांसोबत वांद्रे येथील एका पबमध्ये गेला असताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एकाने गुरुनिलच्या गळ्यावर बाटली मारून जखमी केले होते. गुरूनिलच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे.






























































