
सामना प्रतिनिधी । बीड
बीड लोकसभा निवडणुकीसाठी यंदा उमेदवारांची भाऊगर्दी होती. तब्बल 36 उमेदवार निवडणूक मैदानात उतरले होते. त्यापैकी 34 उमेदवारांची अनामत रक्कम वैध मताच्या तुलनेत कमी असल्याने जप्त करण्यात आली आहे. तब्बल पावणेआठ लाख रूपये प्रशासनाने शासनाच्या तिजोरीत जमा केले आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी 36 उमेदवारांनी आपले भवितव्य अजमावले होते. यात प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांना विजयी करण्यात आले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी बजरंग सोनवणे यांना 5 लाख 98 हजार 7 मते मिळाली होती. उर्वरित 34 उमेदवारांचे डिपॉजीट जप्त झाले आहे. वैध मताच्या 1/6 मते मिळाली नसल्याने त्यांची अनामत रक्कम एकूण 7 लाख 75 हजार रूपये प्रशासनाने कोषागार विभागामध्ये जमा केली आहे.




























































