केसीआर यांना तेलंगणातच झटका ‘बीआरएस’च्या 34 नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात राजकीय वारी करून शक्तीप्रदर्शन करणाऱया तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना त्यांच्या राज्यातच जोरदार झटका बसला आहे. तेलंगणात बीआरएसच्या 34 नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बीआरएसचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव, माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, विद्यमान आमदार दामोदर रेड्डी यांच्यासह पाच माजी आमदार, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, स्थानिक स्वराज संस्थांवरील पदाधिकारी अशा महत्त्वाच्या 34 नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.