
संभाजीनगरमध्ये बुधवारी 35 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता शहरातील बाधितांची संख्या 356 वर पोहोचल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
आज सकाळी नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये जयभीमनगर घाटी, कबाडीपुरा, दत्तनगर येथे प्रत्येकी 5, बायजीपुरा येथील 4, संजयनगर, पुंडलीकनगर येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत. तर बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी भागात बेगमपुरा, हक टॉवरआणि सातारा रोड येथील प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाअ आहे. तर सायंकाळी 4 वाजता नव्याने कोरोना बाधित आढळून आलेल्या 7 जणांमध्ये संजयनगर येथील 4, बायजीपुरा भागातील 1, जयभीमनगर घाटी येथील 2 या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 356 वर पोहोचली आहे.



























































