कराड येथे लाच स्वीकारताना एमएसईबीच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक

शेती पंपासाठी नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सापळा रचून सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमएसईबीच्या कनिष्ठ अभियंत्याला 12 मे रोजी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाठार, ता. कराड येथील एमएससीबीचे कनिष्ठ अभियंता अशोक सोनवले (38) यांनी शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन घेण्याकरिता पाच हजार रुपये लाच मागितली होती. पाच हजार रुपयांची लाच रोख घेताना कनिष्ठ अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक, अविनाश जगताप, ताटे, येवले पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पुण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या