
अफवा पसरण्यासाठी व्हॉट्सॲपचा सर्वाधिक वापर होत आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही माहिती दिली असून फेसबुक ट्विटरला वादग्रस्त पोस्ट हटवण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
कोरोना संकटामुळे अफवांचे प्रमाणही वाढले आहे. त्यावर ताबा मिळवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अफवा पसरवण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर होत आहे असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. व्हॉट्सॲपवर अफवा पसरवल्याच्या 93 घटना समोर आल्या आहेत. तर फेसबुकच्या 61, टिकटोकच्या 3 आणि ट्विटवर दोन घटना समोर आल्या आहेत.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अफवा पसरल्याच्या, फेक न्युज पाठवल्याच्या, 196 केसेस दाखल केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फेसबुक, ट्विटरला वादग्रस्त पोस्ट हटवण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. आतापर्यंत 114 पोस्ट हटवण्यात आल्या असून 37 जणांना अटक करण्यात आली आहे.
























































