हिंदुस्थानात महिला हिंसाचाराचे प्रमाण 37 टक्के, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगात तीन पैकी एका महिलेवर शारिरीक किंवा लैंगिक अत्याचार होतो अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जगात हे प्रमाण 35 टक्के इतके आहे. जगात 38 टक्के महिलांचे खून हे त्यांच्या पतीकडून करण्यात आले आहेत असेही संघटनेने दिली आहे. द हिंदूने या बाबबत वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आशिया विभागात महिला हिंसाचाराचे प्रमाण हिंदुस्थानमध्ये आहे. हिंदुस्थानमध्ये 37.7 टक्के महिलांवर हिंसाचार झाला आहे. ज्या देशांतील लोकांचे वेतन अधिक आहे अशा जगात महिला हिंसाचाराचे प्रमाण 24 टक्के आहे. तर प्रशांत द्वीप भागातील देशांत हेच प्रमाण 37 टक्के इतके आहे.

महिलांविरोधात हिंसाचार हे महिलांच्या पतीकडून होत असते तसेच यात मोठ्या प्रमाणात महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते असेहे संघटनेने म्हटले आहे.

हा हिंसाचार संपवण्यासाठी आरोग्य संघटनेने उपाययोजना केल्या आहेत, त्यासाठी देशांच्या सरकारकडे त्यांनी अहवालही सुपुर्द केले आहेत.