
कधी जर असं झालं की, तुमच्या बँक खात्यात एवढे रुपये जमा झाले की, त्याच्या पुढचे शून्यही मोजणंही तुम्हाला कठीण झालंय? यामुळे तुमचं भविष्य एका क्षणात बदलेल. असं झालं तर तुम्हाला आऩंद होईलच पण एवढे पैसे अचानकपणे खात्यात जमा कसे झाले याविषयी आश्चर्य वाटेल आणि त्याचबरोबर चिंताही वाटू लागेल, मात्र असा प्रकार अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत घडला आहे.
अमेरिकेतील लुइसियाना येथे राहणारे डैरेन जेम्स यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीच्या खात्यात 12 जून रोजी एका दिवसांत 3700 रुपये जमा झाले, मात्र या पैशांच्या मोहात न पडता आणि यापैकी एकाही रुपयाला हात न लावता आधी त्यांनी बँकेला या प्रकाराबाबत माहिती दिली.
तसेच जेम्स माहिती देतात की, या पैशांबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे याबाबत विचारणा करण्यासाठी कोणीतरी आमचे दार ठोठवेल, असे आम्हाला वाटत होते. तसेच हे पैसे आमचे नसल्यामुळे याबाबतीत कोणताच गैरव्यवहार करणार आम्ही करणार नव्हतो. लुझियाना सार्वजनिक सुरक्षा खात्यात माजी कायदा अंमलबजावणी अधिकारी म्हणून जेम्स कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना हेदेखील माहीत होते की, बॅंक खात्यात जमा झालेली ही एवढी मोठी रक्कम स्वत:जवळ ठेवणे म्हणजे चोरी केल्यासारखेच आहे.
यावर ते सांगतात की, 12 जूनला त्यांच्या पत्नीच्या खात्यात 3700 अब्ज रुपये जमा झाले होते. 15 जूनपर्यंत त्यांच्या खात्यात ही रक्कम होती. या चार दिवसांत आम्ही कुटुंबीय अब्जाधीश झालो होतो. जरी आम्ही यातील एकही रुपया खर्च केला नसला तरी, आपल्या बँकेच्या खात्यात असलेल्या रकमेपुढे बरेच शून्य लागलेले आहेत हा विचार मनात येऊन आम्हाला आनंद झाला होता. याबाबत चेज बँकेच्या प्रवक्त्याने बँकेकडून झालेली ही चूक सुधारण्यात आल्याचे सांगितले.

























































