
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील गंगा नदीत स्नान करताना एका अल्पवयीनासह चारजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून अन्य तिघांना गावकऱयांनी वाचवल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही दुर्घटना हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतीनपूर गावात घडली. फैजान (20), मोहम्मद सैफ (20), जामनव (18), सुफिया (13), अनस (22), मोहम्मद अनस (24) आणि समरीन (20) गावात एका लग्न समारंभासाठी आले होते. मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ते गंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. यावेळी फैजान, मोहम्मद सैफ, जामनव आणि सुफिया हे बुडाले, तर अनस, मोहम्मद अनस आणि समरीन यांना गावकऱ्यांनी वाचवले.





















































