
शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱया विरोधात वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी विशेष ड्राईव्ह घेऊन 40 हजार जणांवर कारवाई केली. विना हेल्मेट आणि हॉर्न वाजवणाऱयावर सर्वाधिक कारवाई केली.
शहरात अपघाताचे प्रमाण पाहता बेशिस्त चालकांना शिस्त लागावी यासाठी शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी मुंबईत विशेष ड्राईव्ह घेतला होता. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सकाळी 9 ते रात्री 11 या वेळात हा ड्राईव्ह घेण्यात आला.
या ड्राईव्ह दरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱया 539, विना हेल्मेट 10,338, हॉकिंग 3310, नो पार्ंकग 9547, सायलेन्सर मॉडिफिकेशन 50, फूड डिलिव्हरी वाहन कारवाई 329,ओव्हर स्पिडिंग 98, रेल्वे स्थानक बाहेरील 4794 आणि इतर 10957 असे मिळून 40 हजार 430 जणांवर कारवाई करण्यात आली. या ड्राईव्ह दरम्यान वाहतूक पोलिसांनी एलएच्या पोलिसांची मदत घेतली.




























































