लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 41.72 टक्के पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झालेले असताना मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मात्र पावसाअभावी भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 41.72 टक्के पाऊस झालेला आहे. या पावसामुळे ना पिकांना लाभ झालेला आहे ना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली आहे.

कायम दुष्काळी जिल्हा असा ठसा लातूर जिल्ह्यावर बसलेला आहे. यावर्षी पुन्हा एकदा भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करण्याची वेळ लातूरकरांवर येऊन ठेपलेली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 41.72 टक्के पाऊस झालेंला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही 802.13 मि.मी. एवढी आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 334.61 मि.मी. पाऊस झालेला आहे.

जिल्ह्यातील तालूकानिहाय आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे हे मागील २४ तासात झालेल्या पावसाचे आहेत. लातूर तालूका 216.41 मि.मी.(13.23), औसा तालूका 233.57 मि.मी.(17.86), रेणापूर तालूका 295.63 मि.मी.(22.50), उदगीर तालूका 326.01 मि.मी.(31.86), अहमदपूर तालूका 469.82 मि.मी.(47.67), चाकूर तालूका 320.60 मि.मी.(49.80), जळकोट तालूका 447.50 मि.मी.(20.50), निलंगा तालूका 367.12 मि.मी.(31.75), देवणी तालूका 361.48 मि.मी.(28.67), शिरुर अनंतपाळ तालूका 307.99 मि.मी.(17.33).