महाराष्ट्रातील 428 एटीएम कार्डचा वापर

67

सामना ऑनलाईन । मुंबई

पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयावर झालेल्या सायबर हल्ल्यात जवळपास 94 करोड रुपयांची चोरी करण्यासाठी चोरटय़ांनी महाराष्ट्रातील तब्बल 428 एटीएम कार्डस्चा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेचे मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून अज्ञात व्यक्तीने बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्डधारकांची माहिती चोरून हिंदुस्थानसह 29 देशांतील एटीएमच्या मदतीने 94 करोड 42 लाख रुपये काढले आहेत. ही रक्कम लंपास करण्यात महाराष्ट्रातील 428 एटीएम कार्डस् तर केवळ पुण्यातील 171 एवढे एटीएम कार्डस् वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंतच्या तपासामध्ये सात जणांकडून 3 लाख 55 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातील एकाने 16 हजार तर नंदुरबार येथील एकाने 99 हजार रुपये पोलिसांकडे जमा केले आहेत. एसआयटीने केलेल्या आतापर्यंतच्या तपासात देशातील 41 शहरांतील 71 बँकांच्या एटीएममधून अडीच कोटी रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या