देशात आढळले कोरोनाचे 64 हजार 399 रुग्ण, 861 रुग्णांचा मृत्यू

463

देशात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 64 हजार 399 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या साडे 21 लाखांवर पोहोचली आहे.


गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 64 हजार 399 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 21 लाख 53 हजार 11 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 14 लाख 80 हजार 885 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 28 हजार 747 आहे. गेल्या 24 तासात 861 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 43 हजार 379 रुग्णांवर पोहोचला आहे.

देशात सर्वाधिक राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 355 सक्रिय रुग्णांची संख्या आहे. गेल्या 24 तासात 7 लाख 19 हजार 364 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात 2 कोटी 41 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने आज नवा उच्चांक गाठला. एकाच दिवसात 12 हजार 822 कोरोना रुग्ण आढळले आहेत. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 67.26 टक्क्यांवर पोहोचले असून 11 हजार 81 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 झाला असला तरी त्यातील 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या