
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत ज्येष्ठ पत्रकार संजय शर्मा यांचे ‘4 पीएम’ हे यूटय़ूब न्यूज चॅनेल बंद करण्याचे दिलेले आदेश मागे घेतले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. कोणत्या तथ्यांच्या आधारे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देऊन हे यूटय़ूब चॅनेल बंद केले, असा सवाल करत याबाबत उत्तर देण्याचे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.
4 पीएम न्यूज चॅनेलचे संपादक संजय शर्मा यांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली.ब्लॉकिंग नियमांना सर्वोच्च न्यालायात दिलेल्या आव्हान याचिकांवरील सुनावणी सुरू राहणार आहे. न्यायमूर्ती गवई यांनी विचारले की ब्लॉकिंग आदेश मागे घेतल्यानंतर याप्रकरणात काही शिल्लक आहे का, यावर माहिती तंत्रज्ञान ब्लॉकिंग नियमांना आव्हान देण्यात आलेल्या प्रकरणांशी जोडता येईल, असे सिब्बल म्हणाले.