बोंबला… टेन्शन काही पाठ सोडत नाही! चौथ्या लाटेची कधीही दारावर टकटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेचा संसर्ग उतरणीला लागल्याने सण-उत्सव, सांस्कृतिक सोहळे आणि आता धुळवड दणक्यात साजरी झाली. आता सर्वकाही आलबेल होईल असे वाटत असतानाच टेन्शन काही पाठ सोडत नाही. कारण आपल्या शेजारील चीन आणि युरोपमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आपल्यासाठी पुढील दोन आठवडे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला आणि कोरोनाच्या चौथ्या लाटेवर भाष्य केले. चीन, दक्षिण कोरिया व युरोपमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण बेजबाबदार वागणे योग्य नाही, अशा आशयाचे पत्र केंद्र सरकारने राज्याला पाठवले आहे. हे पत्र राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱयांना पाठवले आहे.

पुढच्याला ठेच
मागचा शहाणा
या म्हणीप्रमाणे आपल्यालाही काळजी घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकार परिस्थितीवर नजर ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सागितले.

पालिकेची एक लाख बेडची तयारी
मुंबई पालिका सतर्क झाली असून चौथ्या लाटेत लक्षणे असलेल्यांसाठी 30 हजार, लक्षणे नसलेल्यांसाठी 40 हजार, हायरिस्क कॉण्टॅक्टसाठी 30 हजार बेडची व्यवस्था करता येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.

दिलासादायक, दोन वर्षांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या शंभराखाली
दोन कर्षांनंतर कोरोनाच्या बाबतीत आज एक दिलासादायक कृत्त आले आहे. राज्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पहिल्यांदाच शंभराच्या खाली आली. आज कोरोनाबाधितांची संख्या 97 होती. यापूर्की एप्रिल 2020 मध्ये ती शंभरपेक्षा कमी होती. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 525 आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98.10 टक्के इतके झाले आहे तर पॉझिटिक्हिटी रेट 9.98 टक्के इतका आहे.