बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला; आणखी 5 रुग्ण आढळले

841

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकून 296 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रलंबित होते. त्यातील काही स्वॅब मंगळवारी तपासण्यात आले. त्यात पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाच जणांमध्ये परळीतील चार जणांचा समावेश आहे तर एकजण बीड शहरातील आहे.

तपासणीसाठी मंगळवारी नव्याने सॅम्पल पाठवण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणावर तपासणीसाठी नागरिकांचे स्वॅबही घेतले जात आहेत. प्रलंबित 296 स्वॅबपैकी काही स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या पाचपैकी चारजण परळी शहरातील तर एकजण बीड शहरातील आहे. सोमवारी पाठवलेल्या 168 स्वॅब आणि रविवारचे 128 स्वॅब प्रलंबित होते. त्यातच मंगळवारी नव्याने जिल्हाभरातून स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. मंगळवारी पाच जण पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 242 च्या घरात गेला आहे. मंगळवारी तीनजणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 78 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह होता तर इतर दोघांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या