
जम्मू-कश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामामध्ये बुधवारी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले. त्यामुळे एक मोठा संभाव्य दहशतवादी हल्ला लष्कराने उधळून लावला. गेल्या 24 तासांत 5 दहशतवादी ठार झाले असून सुरक्षा दलाचे मोठे यश आहे, अशी माहिती कश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली. कुलगाम आणि पुलवामामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच लष्कराने शोधमोहीम सुरू केली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलांनीही प्रतित्त्युर दिले. यात लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. मंगळवारी कुपवाडा जिल्ह्यात गांदर्स परिसरात हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या मेहराजुद्दीन हलवाई ऊर्फ उबैद याचा खात्मा केला होता.
























































