
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
शनिवारी दिल्लीमधील सागरपुर भागात पोलीस ठाण्याला आग लागून आवारातील 50 गाड्यांचे नुकसान झाले आहे.पोलीस ठाण्याच्या बाजुला कचरा डेपोजवळ असणाऱ्या सर्व गाड्या आगीतभस्मसात झाल्या आहेत. या दुर्घटनेत तब्बल 50 गाड्यांचे नुकसान झाले आहे. परंतू आतापर्यंत कोणत्याही जिवीतहानीची नोंद झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
Delhi: More than 50 cars were gutted after fire broke out in a yard at a Police station in Sagarpur yesterday pic.twitter.com/zAnfFsBwq0
— ANI (@ANI) June 2, 2019

























































