50 मेगापिक्सल कॅमेरा असेलेला स्मार्टफोन मिळणार इतक्या कमी किमतीत! वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त चांगले फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात अनेक जण असतात. स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा बॅटरी बॅकअप, कॅमेरा, इनबिल्ड मेमरी, डिस्प्ले व लूक या सर्व गोष्टी तपासल्या जातात. खिशाला परवडणाऱ्या दारात मिळणाऱ्या स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5000 एमएएच बॅटरी बॅकअप सहित रिअलमी आपला सी35 हा स्वस्त फोन आज हिंदुस्थानी बाजारात लॉन्च करत आहे. हा स्मार्टफोन बॉक्सी डिझाईन मध्ये उपलब्ध असून त्यात ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. थायलंड मध्ये याआधीच हा फोन लाँच झाला आहे.

किंमत किती –

रिअलमीचा सी35 हा एन्ट्री लेवल फोन थायलंड मध्ये दोन व्हेरिएंट मध्ये लाँच झाला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 13,350 रुपये एवढी आहे. तर 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 14,500 रुपये एवढी आहे. यामध्ये 6 जीबी रॅम व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध असणार आहे. हिंदुस्थानात हा फोन ऑनलाईन साईट्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

जाणून घ्या फीचर्स –

ड्युअल सिम सपोर्ट
6.6 इंच फुल एचडी वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले
ऑक्टाकोर युनीसॉक टी616 प्रोसेसर
50 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा
मायक्रो लेन्स आणि पोट्रेट कॅमेरा लेन्स
8 मेगापिक्सल फ्रंट सेल्फी कॅमेरा
6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज
साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर
18 वॉट चार्जिंग सपोर्ट
युएसबी टाइप-सी पोर्ट कनेक्टिविटी