अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, अंधेरीतून 51 वर्षीय आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत एक व्यक्ती अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करत होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अंधेरीहून 51 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितेनुसार अंधेरी पूर्व भागात आरोपीच्या शेजारी एक अल्पवयीन मुलगी राहत होती. आरोपी मुलीची छेड काढायचा आणि तिचा लैंगिक छळ कळायचा. पीडित मुलीच्या आईला ही बाब कळाल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.