53 कोटींची हँडबॅग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अबब! हँडबॅगची किंमत 53 कोटी! काय विश्वास बसत नाही ना… इटालियन लक्झरी ब्रॅण्ड ’बोअरीनी मिलानेन्सी’ने खरंच अशी बॅग तयार केली आहे.

बॅगची खासियत म्हणजे यात 10 तोळं सोन्याची फुलपाखरे लावण्यात आली आहेत. इतकेच नाही तर यात हिरे आणि अनेक महागडे दागिने लावून सजावट करण्यात आली. बॅगची किंमत आहे 6 मिलियन युरो म्हणजे हिंदुस्थानी चलनानुसार 52 कोटी रुपये आहे. बॅग तयार करण्यासाठी एक हजार तास लागले.

हँडबॅगच्या किमतीतील काही हिस्सा समुद्राची साफसफाई करण्यासाठी दिले जाणार आहेत. ब्रॅण्डचे सहसंस्थापक मॅटीओ रोडोल्पह् मिलानेन्सी म्हणाले, हल्ली समुद्रात विघटन न होणारे प्लॅस्टिक मोठय़ा प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रदूषण वाढते तसेच माशांना धोका निर्माण होतो.