मुंबईत कोरोनाचे 530 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 530 रुग्ण सापडले असून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 492 जणांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. यातील 38 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 6 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आला. दिवसभरात 976 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत ती 4 हजार 427 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आज दिवसभरात 2 हजार 944 रुग्ण सापडले तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 3 हजार 499 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन 18 हजार 851 वर पोहोचली आहे.