महाराष्ट्रात 24 तासात आढळले 5544 रुग्ण, वाचा ताजी आकडेवारी

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5544 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच काल दिवसभरात 4362 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या महाराष्ट्रात 18,20,059 कोरोनाग्रस्त असून त्यातील 16,80,926 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. तर 90,997 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. आतापर्यंत 47,071 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आढळले 940 कोरोनाग्रस्त

मुंबईत गेल्या 24 तासात 940 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 540 जण कोरोनामुक्त झाले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण 2,82,814 कोरोनाग्रस्त असून त्यातील 2,55,860 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील 10,791 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 13,157 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या