बिटकॉइनच्या नावाखाली 6.9 लाखांची फसवणूक 

बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका ठगाने तरुणाची 6 लाख 90 हजार रुपयाची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   फसवणूक झालेला तरुण हा बोरिवली येथील आहे. जुलै महिन्यात त्याच्या इंस्टाग्रामवर एकाचा मेसेज आला. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून टेलिग्रामवर एक लिंक पाठवली. प्रोसेससाठी आणि खाते तपासण्यासाठी 4 लाख 90 हजार रुपये पाठवण्यास सांगून एकूण 6 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली.