कोरोना रुग्णांसाठी 6 कोटी 76 लाखांची औषध खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे प्रामुख्याने जाणवत आहेत. हे लक्षात घेऊन राज्य सरकारकडून प्रेडनिसोलोन, पॅरासिटामॉल, ऑझिथ्रोमायसीन या औषधांची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी सहा कोटी 76 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. या लाटेदरम्यान कोणत्याही प्रकारे औषधांची कमतरता पडू नये यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. म्हणूनच पुरवणी मागण्यांत यासाठी तरतूद करण्यात आल्यानंतर 6 कोटी 76 लाख 58 हजार 252 रुपयांच्या औषध खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 500 एमजी पॅरेसिटामॉल गोळ्यांसाठी 72 लाख 75 हजार, एझिथ्रोमायसीन सिरपसाठी 27 लाख 62 हजार 500 तर मेथील प्रेडनिसोलोन 500 एमजीच्या औषधासाठी 5 कोटी 76 लाख 20 हजार 752 रुपये खर्चाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.