सहा दिवसांच्या गणपती, गौरींचे विसर्जन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी गुरुवारी अत्यंत भक्तिभावाने सहा दिवसाच्या गणपती व गौरींना निरोप दिला. मुंबई व उपनगरांत रात्री 9 वाजेपर्यंत सार्वजनिक 62 गणपती , घरगुती 21006 आणि 3689 गौरींचे विसर्जन झाले. यात कृत्रिम तलावात सार्वजनिक 31, घरगुती 9465 गणेशमूर्तीचे तर 1527 गौरींचे विसर्जन करण्यात आले.

7 सप्टेंबरला गणरायाचे आगमन झाले आणि भक्तीरसाने अवघी मुंबई न्हावून निघाली. सर्वत्रच चैतन्याचे व उत्साहाचे वातावारण आहे. दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर गुरुवारी सहा दिवसापासून बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर सोमवारी भाविकांनी गणपती, गौरींना भक्तीभावाने निरोप दिला.

मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर सुरु होता. भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्राrया, तरुण- तरूणींसह आबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाटय़ांवर मोठी गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात समुद्र, तलाव आणि कृत्रीम तलावात बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पडले. विसर्जनस्थळी पालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.