अमरावतीत 6 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या 197 वर

511

अमरावतीत शुक्रवारी आलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालानुसार सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 197 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात फ्रेजरपुरा येथील 40 वर्षीय पुरूष व रामनगर येथील 65 वर्षीय पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दुपारी 4 वाजता आलेल्या दुसर्‍या अहवालात पुन्हा 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात रतनगंज येथील 45 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला फ्रेजरपुरा, 60 वर्षीय पुरूष रतनगंज व 21 वर्षीय महिला रतनगंज यांचा समावेश आहे. शुक्रवारी मिळालेल्या दोन अहवालांमध्ये चार रुग्ण एकट्या फ्रेजरपुरा परिसरातीलच आहे. फ्रेजरपुरा परिसर कोरोनाचा नवा कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 20 ते 23 मेपर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. आता ही वाढ सरासरी 4 ते 5 एवढी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या