मुंबई-गोवा महामार्गावरील बेकायदा 60 ठेल्यांवर कारवाई, सरकारची हायकोर्टात माहिती

788
mumbai bombay-highcourt

मुंबई-गोवा महामार्गालगत माणगाव नगर परिषदेच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या 60 बेकायदा ठेल्यांवर कारवाई करण्यात आली असून महामार्ग अडवणार्‍या 11 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

वैभव साबळे यांनी ऍड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत 2014 साली जनहित याचिका दाखल केली. ही बांधकामे अधिकृत करण्यात यावी यासाठी काहींनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

रस्त्याची मोजणी नाही

गेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने या रस्त्याबाबत सरकारला विचारणा केली होती तसेच रस्त्याची मोजणी करून त्याची माहिती कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु याबाबत माहिती न दिल्याने हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली व सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या