गुजरातमध्ये 6000 कोटींचा कोळसा घोटाळा, खाणीतून काढलेला 60 लाख टन कोळसा रस्त्यातून गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

गुजरातमध्ये पाच ते सहा हजार कोटींचा कोळसा घोटाळा उघडकीस आला आहे. कोल इंडियाच्या खाणींमधून काढलेला कोळसा ज्या उद्योगापर्यंत पोहोचवायचा होता तिथपर्यंत गेलाच नाही. तब्बल 60 लाख टन कोळसा रस्त्यातूनच गायब केला. या भ्रष्टाचारात गुजरात सरकारमधील अनेक अधिकारी आणि बोगस एजन्सींचा समावेश आहे.

गुजरातमधील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचा पर्दाफाश ‘दैनिक भास्कर’ने केला आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा घोटाळा सुरू असताना आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आला नाही हे धक्कादायक आहे.

एजन्सी नेमण्याची जबाबदारी राज्याची – केंद्र सरकार

या घोटाळय़ात गुजरात सरकारमधील काही अधिकारी आणि बोगस इजन्सींचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर पेंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल जैन म्हणाले, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एजन्सीना कोळसा दिला जातो. त्यानंतर आमची भूमिका पूर्ण होते. कोल इंडियाचे संचालक सत्येंद्र तिवारी यांनी सांगितले, एजन्सी नेमण्याची जबाबदारी राज्य सरकारच्या उद्योग विभागाची आहे. यात काही आढळले तर राज्याच्या गृह विभागास बाब निदर्शनास आणून द्यावी.

8 ते 10 हजार प्रतिटन दराने विक्री

कोल इंडियाच्या खाणीमधून गुजरातमधील लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 14 वर्षांत 60 लाख टन कोळसा पाठविण्यात आला. 3 हजार रुपये प्रतिटन या दराने याची पिंमत 1800 कोटी होते. मात्र ज्यांच्यासाठी हा कोळसा पाठविला त्यांच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही. लघु आणि मध्यम उद्योग, व्यापाऱयांना कोळसा पुरविण्याऐवजी कोळशाचा काळाबाजार केला गेला. 8 ते 10 हजर रुपये प्रतीटन दराने इतर राज्यांमध्ये विकण्यात आला. हा सहा हजार कोटींचा घोटाळा आहे. यात सरकारी अधिकारी, एजन्सींचे संगनमत आहे, असे या वृत्तात म्हटले आहे