
मुंबईमध्ये सिमेंट काँक्रिटच्या मजबूत रस्त्यांसाठी दुसऱयांदा मागवलेल्या निविदांसाठी नऊ कंत्राटदारांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरासाठी प्रत्येकी तीन कंत्राटदार काम करण्यासाठी तयार झाले आहेत. तीनही विभागांसाठी पालिकेकडून सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यामुळे रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्क रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनकण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. यामधील सुमारे 1 हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. तर शिल्लक रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटचे बनकण्यात येत आहेत. यामध्ये 400 कोटींच्या रस्त्यांसाठी पालिकेने 5 हजार 800 कोटींच्या निकिदा मागकल्या होत्या. मात्र या निकिदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने ही निकिदा प्रक्रिया नक्याने राबकण्यात येत आहे. यासाठी पालिकेने 6079 कोटी 51 लाख 74 हजार 502 कोटींच्या नव्या निविदा मागवल्यानंतर आता एकूण नऊ कंत्राटदारांनी पुढाकार घेतला आहे. नव्या निविदांमध्ये सुमारे 20 टक्क्यांनी खर्च वाढला आहे.
असा होणार खर्च
शहर विभाग – 1233 कोटी 11 लाख 19 हजार 021
पूर्व उपनगर – 846 कोटी 17 लाख 61 हजार 299
पश्चिम उपनगर
झोन ः 3 – 1223 कोटी 84 लाख 83 हजार 230
झोन ः 4 – 1631 कोटी 19 लाख 18 हजार 564
झोन ः 7 – 1145 कोटी 18 लाख 92 हजार 388
असे होणार काम
पश्चिम उपनगर – 253.65 किमी
पूर्क उपनगर – 70 किमी
शहर विभाग – 72 किमी
























































