
सामना ऑनलाईन, मुंबई
देशातील ६६ टक्के जनता सध्या एकाच गोष्टीमागे पागल झाली आहे. ही गोष्ट अशी आहे, जिच्याशिवाय ते एक क्षणही राहू शकत नाही. या गोष्टीने प्रेयसीलाही मागे सारले आहे. एका सर्वेक्षणातून ही आश्चर्यचकीत करणारी बाब उजेडात आली असून ‘ या’ गोष्टीच्यामागे पागल असलेल्या देशांमध्ये हिंदुस्थानी नागरिकांचा मलेशियानंतर दुसरा क्रमांक लागतो.
आम्ही ज्याबद्दल बोलत आहोत ती गोष्ट आहे मोबाईल.लाइमलाइट नेटवर्क्सने एक सर्वेक्षण केलं आहे, ‘स्टेट ऑफ डिजिटल लाइफस्टाइल्स’असं या सर्वेक्षणाचं नाव असून यात दर्शनास आलंय की देशातील ग्राहकांपैकी दोन-तृतीयांश ग्राहक हे मोबाईल फोन्सशिवाय एक दिवसही सुद्धा राहू शकत नाहीत. या सर्वेक्षणात दहा देशांमधील नागरिकांना प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वेक्षण संपल्यावर जो अहवाल तयार करण्यात आला त्यातून हिंदुस्थानी नागरिकांचं मोबाईल प्रेम लोकांसमोर आलं आहे. मोबाईलच्या अधीन असलेल्या देशांमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर हा जर्नमी आणि जपानचा आहे. जर्मनीत २५ टक्के जनता ही मोबाईलसारख्या उपकरणांशिवाय राहू शकत नाही तर जपानमधली ११ टक्के जनता मोबाईल आणि तत्सम गॅजटशिवाय राहू शकत नाही.






























































