
राज्य परीक्षा परिषदेने टीईटी गैरव्यवहारप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. दोषी आढळलेल्या तब्बल 7 हजार 880 उमेदवारांना यापुढे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा देता येणार नाही. तसेच यापैकी जे उमेदवार सेवेत असतील त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे.
2019-20 साली घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरव्यवहार करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. या घोटाळ्यात शिक्षण परिषद आयुक्त तुकाराम सुपेसह मोठय़ा अधिकाऱयांना अटक करण्यात आली. इतकेच नाही तर सायबर पोलिसांच्या हाती अनेक कोटींची संपत्ती लागली होती. या सगळ्या उमेदवारांवर दोषारोपपत्र पुणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित उमेदवारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत प्रशासन निर्णय घेणार होते. ती कारवाई आज करण्यात आली. ज्या 7 हजार 880 उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे.

























































