
मध्य रेल्वेने कोकणात गणपतीला जाणाऱया चाकरमान्यांसाठी 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या असून संपूर्ण आरक्षित असलेल्या या गाडय़ांचे बुकिंग गुरुवार 8 जुलैच्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या ट्रेन सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरीदरम्यान चालविण्यात येणार आहेत. या ट्रेन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सर्व नियम पाळून चालविण्यात येणार आहेत.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (36 फेऱया)
ट्रेन क्र. 01227 ः ही ट्रेन दररोज 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सीएसएमटीहून रात्री 12.20 वा.सुटून सावंतवाडी रोडला दुपारी 2.00 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 01228 ः ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 5 ते 22 सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दु.2.40 वा.सुटून सीएसएमटीला पहाटे 4.35 वा. पोहोचेल.
थांबे ः दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (10 फेऱया)
ट्रेन क्र. 01229 ः ही ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा सोमवार आणि शुक्रवार सीएसएमटीहून दुपारी 1.10 वा. सुटून रत्नागिरीला रात्री 10.35 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 01230 ः ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा रविवार आणि गुरुवार रत्नागिरीहून रा.11.30वा. सुटून सीएसएमटीला स.8.20 वा. पोहोचेल.
थांबे ः दादर, ठाणे, (केवळ ट्रेन क्र. 01229) पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड
पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रैसाप्ताहिक (16 फेऱया)
ट्रेन क्र. 01231 ः ही ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवार पनवेलहून स.8.00 वा.सुटून सावंतवाडीला रा. 8.00 वा. पोहचेल.
ट्रेन क्र. 01232 ः ही परतीची ट्रेन 7 ते 22 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवार सावंतवाडीहून रा. 8.45 वा. सुटून पनवेलला स. 7.10 वा. पोहचेल.
थांबे ः रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक स्पेशल (10 फेऱया)
ट्रेन क्र.01233 ः ही ट्रेन 9 ते 23 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा गुरुवार आणि रविवार पनवेलहून स. 8.00 वा. सुटून रत्नागिरीला दु. 3.40 वा. पोहोचेल.
ट्रेन क्र. 01234 ः ही परतीची ट्रेन 6 ते 20 सप्टेंबरदरम्यान आठवडय़ातून दोनदा सोमवारी आणि शुक्रवारी रत्नागिरीहून रा. 11.30वा. सुटून पनवेलला स. 6.00 वा. पोहचेल.
थांबे ः रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
या सर्व गाडय़ांच्या डब्यांची स्थिती ः एक एसी 2 टिअर कम एसी 3 टिअर, चार एसी 3 टिअर, 11 स्लीपर क्लास, 6 सेकंड क्लास सीटिंग
ज्येष्ठ नागरिकांना सवलत का नाही?
या ट्रेनला स्पेशल फेअरच्या नावाखाली जादा भाडे आकारण्यात येत असते. ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलतसुद्धा नसते. कोविड स्पेशल म्हणून अशा ट्रेन चालविताना रेल्वेकडून प्रवाशांना साधा मास्क किंवा सॅनिटायझरही पुरविले जात नसल्याचे प्रवासी बळीराम राणे यांनी म्हटले आहे.





























































