नराधमाच्या बलात्कारात ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ratan-gushinge

सामना ऑनलाईन, बदनापूर

जालना जिल्हय़ाच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडीत सोमवारी माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तीसवर्षीय नराधमाने ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर अमानुष बलात्कार केला असून, त्यात या वृद्धेचा गुदमरून मृत्यू झाला आहे. विवस्त्रावस्थेत पळून जाण्याच्या बेतात असलेल्या या नराधमाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल करून नराधमास अटक केली आहे.

रतन महाजन गुशिंगे (३०) असे या विकृत  मनोवृत्तीच्या तरुणाचे नाव आहे. आज पहाटेच त्याने हे दुष्कृत्य केल्याचे उघडकीस आले. गावातील काही लोकांना पहाटे या प्रकाराची कुणकुण लागली. त्यांनी बदनापूर ठाण्याचे उपनिरीक्षक चैनसिंग गुशिंगे यांना याबाबत माहिती दिली. तेवढय़ात घटनास्थळी लोक जमल्याची चाहूल लागताच हा नराधम तरुण विवस्त्रावस्थेतच पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु लोकांनी त्याला धरून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. नराधम रतन दारू प्यायलेला होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपकिभागीय पोलीस अधिकारी शिलकंत ढकळे, पोलीस निरीक्षक रामेश्कर खनाळ, चैनसिंग गुशिंगे, पंढरीनाथ बोलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा वृद्ध महिला मृतावस्थेत आढळून आली. आरोपी नराधमास अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२,३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले. १७ जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.