नेवासात सुमारे 76 टक्के मतदान

518

नेवासा तालुक्यात,खरवंडी, बेलपिंपळगाव, भाळगाव,पाने गाव, खाटकवाडी, कुकाना या गावात मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदान सुरू होते. नेवासा तालुक्यात मतदानासाठी उत्साह दिसून आला. विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव येथे तर माजी आमदार शंकर गडाख यांनी सोनई येथे मतदानाचा हक्क बजावला. नेवासा तालुक्यात मतदान केंद्रावर काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक चकमकी झाल्या,मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

आपली प्रतिक्रिया द्या