आंध्रातील 8 मच्छीमार बांगलादेशच्या ताब्यात

समुद्री हद्दीचा भंग केल्याच्या कारणावरून आंध्र प्रदेशच्या विजयनगर जिह्यातील आठ मच्छीमारांना बांगलादेश नौदलाने ताब्यात घेतले आहे. या मच्छीमारांची सुटका व्हावी यासाठी आंध्र सरकारने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. ढाका येथील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयाचे एक विशेष कायदेशीर पथक त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असल्याचे पेंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.