अंबरनाथमध्ये तीन तासांत आठ हजार किलो प्लॅस्टिक जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालता चालता अंबरनाथकरांनी तीन तासांत तब्बल आठ हजार किलो प्लॅस्टिक जमा केले. निमित्त होते ‘इंडिया प्लॉग रन’ या मोहिमेचे. या सर्व प्लॅस्टिक कचऱयांचे वर्गीकरण करून किघटन करण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी साडेसहा वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. शहरातील 127 शाळांचे सुमारे 40 हजार विद्यार्थी, शिक्षक, आयटीआय, महिला बचतगट, परिसरातील दिव्यांग आदी मोठय़ा संख्येने या मोहिमेत सहभागी झाले. सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन या संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कांद्रपाडा, शास्त्रीनगर आदी भागात फिरून प्लॅस्टिकमुक्तीची विशेष रॅली काढली. शहराच्या विविध ठिकाणांहून स्वच्छतादुतांनी जमा केलेले प्लॅस्टिक कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले. यावेळी आपले शहर स्वच्छ, सुंदर व प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा काळेकर यांनी केले.