एलआयसीत 800 सहाय्यकांची भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lic-logo

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या 800 जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. सहाय्यक पदासाठी प्राथमिक परीक्षा येत्या 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ऑनलाइन मुख्य परीक्षा नंतर जाहीर केली जाणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असून कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हे अर्ज www.licindia.in/careers या संकेतस्थळावर पाठवता येतील. अधिक माहितीसाठी नरीमन पॉइंट येथील ‘योगक्षेम’ इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समिती व भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या कार्यालयात महेश लाड, श्रीधर पाथरे, शरद एक्के, दीपक मोरे, श्याम पांचाळ, पांडुरंग खेडेकर, मनोहर लाड, तुकाराम गायकवाड, संतोष राऊत यांच्याशी सकाळी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन लोकाधिकार समितीचे सरचिटणीस गोपाळ शेलार यांनी केले आहे.