
कोरोनाच्या महामारीपासून बचावासाठी बहुतेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करताहेत. सुरुवातीच्या काळात कर्मचाऱयांना वर्क फ्रॉम होम आवडत असले तरी आता मात्र त्यांना त्याचा कंटाळा आल्याचे दिसतेय. नुकत्याच एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 84 टक्के कर्मचाऱयांनी वर्क फ्रॉम होम नको…पुन्हा ऑफिस सुरू करा, असे मत व्यक्त केले आहे.
डेलॉइट या कंपनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल एक हजार कर्मचाऱयांचे ऑनलाइन सर्वेक्षण करून हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याबाबतचा अहवाल ‘ग्लोबल स्टेट ऑफ कन्झ्युमर ट्रक’वर प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात अनेक कर्मचाऱयांना आता ऑफिसची ओढ लागल्याचे दिसतेय. सहकाऱयांसोबत होणारी चर्चा, एकमेकांची मस्करी, ऑफिसमधील मीटिंग या सर्वांची आठवण येत असल्याचे कर्मचाऱयांचे म्हणणे आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी ऑफिस सुरू झाल्यावर गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे टाळणार असल्याचे 70 टक्के कर्मचाऱयांनी सांगितले. तर 67 टक्के कर्मचाऱयांनी ऑफिस गाठण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून पॅबने प्रवासाला पसंती दिली आहे.




























































