91 स्प्रिंगबोर्डची ‘ईयू-इंडिया’ इनोव्‍हेशन सेंटरसोबत हातमिळवणी

91 स्प्रिंगबोर्डने ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटरसोबत हातमिळवणी केली आहे. हे दोघे मिळून युरोपियन स्‍टार्टअपना हिंदुस्थानातील अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये प्रवेश करण्‍याची सुविधा देणार आहेत. युरोपियन स्‍टार्टअपना देशातील कंपन्‍यांसोबत सहयोग करण्‍यास याद्वारे मदत होणार आहे. यामुळे हिंदुस्थान आणि युरोपदरम्‍यानच्‍या द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. इंद्रे कुलिकाउस्काइट हे प्रकल्‍पाचे समन्‍वयक आहेत. 91 स्प्रिंगबोर्डच्या सुधीर के. व्‍ही. (Sudheer K. V.) यांनी म्हटले आहे की हिंदुस्थान जगातील सर्वात मोठ्या इकोयंत्रणांपैकी एक आहे. 91 स्प्रिंगबोर्डच्या प्रतीक जैन (Prateek Jain) यांच्या म्हणण्यानुसार या हातमिळवणीमुळे 2 अर्थव्‍यवस्‍था एकत्र येण्यास मदत होईल आणि अर्थव्‍यवस्‍था झपाट्याने विकसित होण्यास त्याचा फायदा मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या