सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड लतीफ भटसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलगाम जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी सीआरपीएफ चौकीवर तैनात जवानांवर हल्ला करणाऱया दोन दहशतवाद्यांचा झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी कश्मीर खोऱयातील एकमेव उरलेला कमांडर लतीफ भट याचा समावेश आहे. हाच या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्यानंतर कुलगाम जिह्यात मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. या हल्ल्यामागे लतीफ भट याचा हात असल्याचे समोर आले होते. शोधमोहिमे दरम्यान लतीफ भट आणि त्याचा साथीदार उमर हे कुलगाम जिह्यात लारू येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जम्मू-कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी त्या भागात घेराव टाकला. संशयित ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.