गेल्या 24 तासात राज्यात आढळले कोरोनाचे साडे नऊ हजार रुग्ण, 260 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 9 हजार 509 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2 लाख 76 हजार रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 15 हजार 576 वर पोहोचला आहे. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 537 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकट्या पुण्यात 44 हजार 204 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 1105 रुग्ण आढळले आहेत. तर 393 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात मुंबईत 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 16 हजार 451 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 88हजार 299 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या 21 हजार 412 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 6 हजार 444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के असून डबलिंग रेट हा 78 दिवसांवर आला आहे. मुंबईत आतापर्यंत 5 लाख 46 हजार 620 कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.