गेल्या 24 तासात इटलीत कोरोनामुळे 97 जणांचा तर इराणमध्ये 54 जणांचा मृत्यू

1054
प्रातिनिधिक फोटो

कोरोनानामुळे जगभरात मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत इटलीत 97 जणांचा मृत्यू झाला आहे, तर इराणमध्ये 54 जणांचा मृत्यू झाला आहे.

इटलीमध्ये आतापर्यंत 463 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीननंतर सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशात 7 हजार 985 जणांना या विषाणूची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे इस्राएलमध्ये सर्व पर्यटकांना वेगळे ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नेतन्याहूंनी सोमवारी तशी घोषणा केली होती. इस्राएलमध्ये 50 जणांना या विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती आहे. हा कटू निर्णय आहे परंतु लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. इस्राएल आधीच परदेशातून येणार्‍या पर्यटकांवर बंदी घतली आहे. इस्राएलने बुधवारी फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रिया आणि स्विर्त्झलँडहून येणार्‍या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

इराणमध्येही गेल्या 24 तासांत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना वायरसमुळे इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांनी आपले वार्षिक भाषण रद्द केले होते. तर इराणमध्ये कोरोना लागण झालेले 7 हजार 161 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 291 जणांचा मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या