मुंबईत पहिल्यांदाच आरएसएसची इफ्तार पार्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रीय स्वंसेवक संघाशी (आरएसएस) संबधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने (एमआरएम) रमाजानच्या दिवशी मुंबईत इफ्तार पार्टीचे आयोजन केलं आहे. पहिल्यांदाच ही पार्टी मुंबईत घेण्यात आयोजित करण्यात आली आहे. ४ जून रोजी सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी होणार असून त्याकरता मुस्लिम देशातील राजकीय नेते तसेच प्रतिष्ठित व्यक्तीं सुद्धा या पार्टीकरता उपस्थित राहणार आहेत.

या आधी २०१५मध्ये इफ्तार पार्टीच आयोजन करण्यात आलं होत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्टीकरता नकार दिला होता. मुंबईत ही इफ्तार पार्टी आायोजित करण्यामागचा आरएसएसचा मुख्य उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. मुंबईतल्या पश्चिम व दक्षिण भागांमधील मुस्लिम भागात पोहोचायचं हा आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संचालक विराग पाचोरे यांचं म्हणणं आहे की, ‘मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून ती सगळ्यांना नेहमीच आर्थिक मदतीचा हात पुढे करत असते. मुंबईत बऱ्याच प्रमाणात मुस्लिम व्यापारी राहतात आणि त्यांचा देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये आरएसएसबद्दल गैरसमज आहेत. ते दूर करणं हाच या इफ्तार पार्टीचा हेतू आहे’.

मात्र राजकीय विश्लेशकांच्या मतानुसार ही पार्टी म्हणजे या भाजपचा मुस्लिम मतं मिळवण्यासाठीचा डाव आहे. पण यानं काही साध्य होणार नाही. कारण जोपर्यंत बीफ बॅन आणि त्यावरून सुरू असलेला हिंसाचार, समान नागरि कायदा, दहशतवादाच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना टार्गेट करणं यावर संघ आपली भूमिका स्पष्ट करत नाही किंवा या गोष्टी थांबवत नाही तोपर्यंत संघ आणि मुस्लिम समाजाची नाळ जोडणं कठीण असल्याचं राजकरणीय विश्लेषक प्रकाश आकोलकर यांनी म्हटलं आहे.