
सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क
डॉक्टर आपल्यासाठी एखाद्या देवदुतासारखा असतो. कितीही गंभीर परिस्थितीत न डगमगता तो रुग्णाची सेवा करत असतो. त्या दरम्यान, रुग्णाचं मन शांत करण्यासाठी कित्येकदा काही डॉक्टर त्याच्याशी गप्पा मारतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून रुग्णाला वेदनांची जाणीव विसरायला लावतात. पण, रुग्णासाठी केलेली अशीच एक कृती एका डॉक्टरच्या अंगलट आली असून तिला त्यासाठी जेलची हवा खावी लागणार आहे.
या महिला डॉक्टरचं नाव विंडेल बाऊट आहे. या डॉक्टरबाई शस्त्रक्रियेदरम्यान चक्क नाचायच्या. त्यांनी त्यांच्या या नृत्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्टही केले. एका व्हिडीओत तर चक्क बेशुद्ध रुग्णाच्या समोर शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टर नाचत असल्याचं दिसत आहे. इतकंच नव्हे तर ऑपरेशन थिएटरमधले तिचे सहकारीही सोबत नाचताना दिसत आहेत. शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारं मास्कही तिने घातलेलं नाही.
आता या डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, विंडेल या आपलं प्रमोशन करण्यासाठी असे व्हिडीओ टाकत. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच रुग्णांनी तब्बल पाच तक्रारी दाखल केल्या आहेत.
पाहा व्हिडीओ-




























































