बिपाशा बासू आजारी, हिंदुजा रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिपाशाची प्रकृती स्थिर असली तरी तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

हिंदुजा रुग्णालयातील डॉ. किंजल मोदी तिच्यावर उपचार करत असून कालपासून बिपाशाच्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. बिपाशाचा नवरा करण सिंग ग्रोव्हर तसेच तिच्या कुटुंबियांकडून अद्याप काहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून बिपाशा श्वसनासंबंधी त्रासावर हिंदुजामध्ये उपचार घेत होती मात्र शनिवारी तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.